भाजपला मिळाले 'सर' रवींद्र जडेजाचे बळ; पत्नीचा अधिकृत पक्षप्रवेश

वृत्तसंस्था
सोमवार, 4 मार्च 2019

अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाने भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. रिवाबा राजपूत संघटना असलेल्या करणी सेनेची गुजरात महिला प्रदेशाध्यक्ष होती. पण आगामी लोकसभेच्या तोंडावर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

अहमदाबाद- अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाने भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. रिवाबा राजपूत संघटना असलेल्या करणी सेनेची गुजरात महिला प्रदेशाध्यक्ष होती. पण आगामी लोकसभेच्या तोंडावर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपसाठी ही चांगली बातमी आहे. रिवाबा जडेजाने जामनगर येथे गुजरातचे कृषीमंत्री आरसी फालडू आणि खासदार पूनम मदाम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रिवाबा जडेजाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने 2016 मध्ये रिवाबासोबत विवाह केला. 

दरम्यान, रविंद्र जडेजाची बहिणदेखील राजकारणात आहे. बन नैनाबा जडेजाने नॅशनल वुमन्‍स पक्षात प्रवेश केला आहे. नॅशनल वुमन्‍स पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्‍ट्र, गुजरात आणि राजस्‍थानची जबाबदारी नैनाबा जडेजाला दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricketer Ravindra Jadeja's wife Rivaba joins BJP