घरगुती वादावादीतून पत्नी, मुलांना जाळले

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

दरभंगा - पत्नीशी झालेल्या वादावादीतून एकाने पत्नी आणि दोन मुलांना जाळून मारल्याची घटना दरभंगा जिल्ह्यातील तेकसर गावात घडली, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. या प्रकरणातील संशयिताची ओळख पटली असून महंमद हरून असे त्याचे नाव आहे. हरून याने पत्नी रुकसाना आणि मुलगे झिशान आणि इना असे त्यांची नावे आहेत. हरून याचे काल रात्री पत्नीशी भांडण झाले होते, अशी माहिती पोलिस अधिकारी दिलनवाझ अहमद यांनी सांगितले. हरूनची पत्नी आणि मुले घटनास्थळीच मरण पावली असून उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे मृतदेह दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

दरभंगा - पत्नीशी झालेल्या वादावादीतून एकाने पत्नी आणि दोन मुलांना जाळून मारल्याची घटना दरभंगा जिल्ह्यातील तेकसर गावात घडली, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. या प्रकरणातील संशयिताची ओळख पटली असून महंमद हरून असे त्याचे नाव आहे. हरून याने पत्नी रुकसाना आणि मुलगे झिशान आणि इना असे त्यांची नावे आहेत. हरून याचे काल रात्री पत्नीशी भांडण झाले होते, अशी माहिती पोलिस अधिकारी दिलनवाझ अहमद यांनी सांगितले. हरूनची पत्नी आणि मुले घटनास्थळीच मरण पावली असून उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे मृतदेह दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेनंतर महंमद हरून हा पळून गेला असून त्याच्यावर पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे अहमद यांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: crime in darbhanga

टॅग्स