पटना पोलिस स्थानकाजवळच बालिकेवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
रविवार, 15 एप्रिल 2018

पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान पीडित बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पीडित अल्पवयीन बालिकेवर दुष्कृत्य करत असताना यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. तर यापैकी इतर दोघे फरार होण्यास यशस्वी झाले.

पटना : पटना पोलिस स्थानकाजवळच एका अल्पवयीन बालिकेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पटना पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य दोघे फरारी आहेत. ही घटना मिठापूर सब्जी भागात घडली. या परिसरात 500 मीटर अंतरावर पटना पोलिस स्थानक आहे.  

पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान पीडित बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पीडित अल्पवयीन बालिकेवर दुष्कृत्य करत असताना यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. तर यापैकी इतर दोघे फरार होण्यास यशस्वी झाले. पीडित बालिका अर्धनग्न अवस्थेत आढळून आली. या घटनेनंतर त्या बालिकेला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

Rape

याबाबत पीडित बालिकने सांगितले, की रेल्वे स्थानकात एका रेल्वेत चढत असताना त्यावेळी या नराधमांनी मिठापूर भाजी मंडई परिसरातून अपहरण केले आणि त्यानंतर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, अन्य दोघे फरार आहेत. 

Web Title: Crime Girl gangraped near police station in Patna two arrested from the spot