नोकरी मिळविण्यासाठी त्याने दिली वडिलांचीच 'सुपारी'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

ओमप्रकाश मंडल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मंडल यांना त्यांचा मुलगा पवनने हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार मारेकऱ्यांनी ओमप्रकाश यांच्यावर गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात त्यांच्या खांद्याला गोळी लागली.

पटना : भारतीय रेल्वेत कर्मचारी असलेले वडिलांची नोकरी मिळविण्यासाठी त्यांच्याच मुलाने त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांसह त्यांच्या मुलाला अटक केली. या मारेकऱ्यांनी संबंधित व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली.  

ओमप्रकाश मंडल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मंडल यांना त्यांचा मुलगा पवनने हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार मारेकऱ्यांनी ओमप्रकाश यांच्यावर गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात त्यांच्या खांद्याला गोळी लागली. जेव्हा त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली तेव्हा ओमप्रकाश हे त्यांच्या मुंगर जिल्ह्यातील ऑफिसर्स क्लब रोडवरील कार्यालयात होते. या गोळीबारातनंतर त्यांना स्थानिक रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे, पोलिसांनी मारेकरी रवी रंजन याला रामपूर येथून अटक केली. तसेच सुनील मंडल आणि ओमप्रकाश यांचा मुलगा पवन मंडलला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Firing

याबाबत पूर्व कॉलनी पोलिस स्थानकातील पोलिस अधिकारी मोहम्मद अली साब्री यांनी सांगितले, की पवन हा मागील काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पवनचे वडील 30 एप्रिलला सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे त्यांच्या जागी पवन नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे पवनने त्याच्या वडिलांच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी त्याने काही सराईत गुन्हेगारांना याची सुपारी दिली होती. त्यानुसार या मारेकऱ्यांनी ओमप्रकाश मंडल यांची हत्या केली. 

दरम्यान, पवनने 2 लाख रुपये देऊन ओमप्रकाश मंडल यांच्या हत्येची सुपारी दिली होती. यातील काही रक्कम अॅडव्हान्स म्हणून दिली होती. त्यामुळे ओमप्रकाश यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. या हत्येप्रकरणी यातील तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून, या सर्वांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे. 

Web Title: Crime Man gives fathers supari for rail job three men arrested