पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
शनिवार, 24 मार्च 2018

आसाममध्ये पाचवीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बलात्कारानंतर पीडित मुलीचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना आसामच्या नागाव जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, यातील तिसरा आरोपी फरार आहे.

गुवाहटी : आसाममध्ये पाचवीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बलात्कारानंतर पीडित मुलीचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना आसामच्या नागाव जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, यातील तिसरा आरोपी फरार आहे.

Gang Rape

या गंभीर घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीला गुवाहटी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. यातील एक आरोपी अल्पवयीन असून, तो आरोपी त्या विद्यार्थिनीच्याच वर्गात शिक्षण घेत आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसरा आरोपी झाकीर हुसैन हा त्याच गावात राहत असून, तो सध्या फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

Rape

दरम्यान, जेव्हा ही घटना घडली तेव्हा बालिका घरात एकटीच होती. हे तिघेही तिच्या घरी गेले आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी त्या बालिकेच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटविण्याचा प्रयत्न केला, यातील फरार आरोपीला शोधण्यासाठी आम्ही आठ ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. मात्र, संबंधित आरोपी अद्यापही फरार आहे, अशी माहिती नागावचे पोलिस अधीक्षक शंकर रायमेधी यांनी सांगितले.

Web Title: crime news Class 5 girl gang raped burnt alive in Assam Nagaon