21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार ; पोलिसांकडून आरोपींची भरचौकात 'परेड'

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

येथील एका कोचिंग इन्स्टिट्यूमध्ये शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरूणीचे आरोपींनी अपहरण केले होते. त्यानंतर या आरोपींनी तिला एका खोलीत नेऊन तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यातील एक आरोपी पीडित तरुणीच्या परिचयाचा असल्याचे सांगितले जात आहे.

भोपाळ : एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भोपाळच्या एमपीनगर भागात राहणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, या चारही आरोपींची पोलिसांकडून भरचौकात 'परेड' घेण्यात आली. 

Gang Rape

येथील एका कोचिंग इन्स्टिट्यूमध्ये शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरूणीचे आरोपींनी अपहरण केले होते. त्यानंतर या आरोपींनी तिला एका खोलीत नेऊन तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यातील एक आरोपी पीडित तरुणीच्या परिचयाचा असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की यातील प्रमुख आरोपीची ओळख पटली असून, त्याचे नाव शैलेंद्र सिंग असे आहे. शैलेंद्र सिंग याचे एमबीए शिक्षण पूर्ण झाले असून, पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघे एकमेकांना ओळखत असे. त्यानंतर या ओळखीतून या नराधमांनी पीडित तरुणीवर बलात्कार केला.

दरम्यान, राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चौहान यांनी पोलिसांना काम करा किंवा बाहेर जा, असा इशाराच दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर पोलिसांनी अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. 

Web Title: Crime News Gang raped on Girl police arrested 4 peoples