गुजरातमध्ये फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघड 

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

येथे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराज्य फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघड केले आहे. येथे नोकरीसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची माहिती अन्य कॉल सेंटर्संना विकली जात होती. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी येथील प्रसिद्ध रोजगार पोर्टलचा व्यवस्थापक प्रकाश भट्ट याच्यासह आठ जणांना अटक केली.

अहमदाबाद : येथे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराज्य फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघड केले आहे. येथे नोकरीसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची माहिती अन्य कॉल सेंटर्संना विकली जात होती. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी येथील प्रसिद्ध रोजगार पोर्टलचा व्यवस्थापक प्रकाश भट्ट याच्यासह आठ जणांना अटक केली.

शशी मिश्रा, कैलासचंद्र ठाकूर, रतनकुमार मिश्रा, कुलीपकुमार सिंह, रामदिनसिंह आणि पवनकुमार मिश्रा आदींचा अटक झालेल्यांमध्ये समावेश आहे. या टोळीने हजारो तरुणांची फसवणूक करून त्यातून मिळालेला निधी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये वळता केल्याचा संशय आहे. 

Web Title: crime news in Gujarat