अफवा पसरविल्यास 'ऍडमिन'वर गुन्हा

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

वाराणसी : "व्हॉट्‌सऍप' ग्रुपवरून अफवा पसरविणारा संदेश पसरल्यास त्या ग्रुपच्या ऍडमिनिस्ट्रेटरवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असा आदेश जारी करणारे संयुक्त निवेदन वाराणसीचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे गंमत म्हणून, अथवा शहानिशा न करता चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

"व्हॉट्‌सऍप'च्या माध्यमातून सर्रासपणे चुकीची माहिती देणाऱ्या बातम्या, अश्‍लील आणि अवमानजनक मजकूर लिहून तयार केलेली छायाचित्रे-व्हिडिओ यांचा प्रसार होत असतो. यामुळे काही वेळा समाजामध्ये तणाव निर्माण होण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकद्वारे अफवा पसरविल्यास "ऍडमिन'वर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे या आदेशात म्हटले आहे. व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोठा वाव मिळाला असला तरी त्याचा योग्य वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे टिप्पणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी केली आहे. भारतामध्ये व्हॉट्‌सऍपचे 20 कोटी यूझर्स आहेत.

Web Title: Crime on whatsapp 'Admin' if rumors spread