kl ramesh.jpg
kl ramesh.jpg

फेसबुकवरुन केरळमधील डाव्या सरकारवर केली टीका अन् गेली नोकरी

नवी दिल्ली- कन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लि.च्या एका कर्मचाऱ्याला केरळमधील डाव्या सरकारवर टीका केल्याने नोकरी गमवावी लागली आहे. या कर्मचाऱ्याने केरळ सरकारवर फेसबुकवरुन टीका केली होती. त्यानंतर पिनाराई विजयन सरकारने त्याला नोकरीवरुनच काढून टाकले आहे. केएल रमेश नावाच्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर कन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लि.चे मुख्य व्यवस्थापक व्ही. तुलसीदास यांनी रमेश यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचा आदेश जारी केला आहे. 

रमेश कन्नूर विमानतळावर फायर अँड रेसक्यू विंगचे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पद्मनाभस्वामी मंदिरासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे कौतुक केले होते. याचवर्षी जुलैमध्ये न्या. यू यू लळित आणि इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली दोन न्यायाधीशांच्या पीठाने 2011 मध्ये केरळ उच्च न्यायालयाचा आदेश फेटाळला होता. त्यामुळे राज्य सरकारला मंदिर व्यवस्थापन आणि संपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. 

आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, जोपर्यंत त्रावणकोर शाही परिवार अंतिम समिती गठीत करत नाही. तोपर्यंत तिरुवनंतपूरमचे जिल्हा न्यायाधीश मंदिराच्या रोजच्या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी एक प्रशासकीय समितीचे नेतृत्त करतील. 

श्री पद्मनाभस्वामी मंदिर मौल्यवान दगड आणि सोने-चांदीचे दागिने मिळाल्यानंतर चर्चेत आले होते. जगातील श्रीमंत मंदिरांपैकी हे एक मंदिर असल्याचे गणले जाते. सर्वोच्च न्यायालयाने त्रावणकोर शाही कुटुंबीयांच्या अधिकार कायम ठेवण्याच्या आदेशावर आनंद व्यक्त केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com