शाळांवरील बंदी हा अत्याचारच : मेहबूबा

जमात-ए-इस्लामीशी संलग्न संस्थेची पाठराखण
Mehbooba Mufti
Mehbooba MuftiSakal

श्रीनगर - फलाह-ए-आम ट्रस्टतर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांवरील बंदी म्हणजे जम्मू-काश्मीरच्या जनतेचे भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी लादण्यात आलेल्या अत्याचाराचा आणखी एक प्रकार आहे, अशी टीका पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी केली.

ही संस्था जमात-ए-इस्लामी या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संलग्न आहे. त्यांच्यातर्फे चालविल्या जाणाऱ्या तीनशेहून जास्त शैक्षणिक संस्था बंद कराव्यात असा आदेश जम्मू-काश्मीर सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. शालेय शिक्षण सचिव बी. के. सिंह यांनी हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार या शाळा जिल्हा प्रशासनाशी सल्लामसलत करून १५ दिवसांत सील कराव्यात असे आदेश विविध जिल्ह्यांतील मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलांनी सध्या सुरु असलेल्या सत्रात जवळच्या सरकारी शाळेत दाखल व्हावे असेही कळविण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर मेहबूबा यांनी ट्विटद्वारे ही टीका केली. त्यांनी पुढे म्हटले आहे की, जमिनीवरील मालकी, स्रोत आणि नोकऱ्या यानंतर शिक्षणाला शेवटचे लक्ष्य करण्यात आले आहे, मात्र काश्मिरी यावर मात करतील आणि आपल्या मुलांचे नुकसान होऊ देणार नाहीत.

बंदीचे कारण

फलाह-ए-आम ट्रस्टतर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांबाबत जम्मू-काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास संस्थेने चौकशी केली होती. त्यात प्रचंड बेकायदा कामे, उघड भ्रष्टाचार तसेच सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असे प्रकार आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर हा बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com