आता खतांची सबसिडी मिळणार थेट बँक खात्यात!

आता खतांची सबसिडी मिळणार थेट बँक खात्यात!

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 70 हजार कोटी रुपयांचे धान्याचे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित (ट्रान्सफर) करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी तीन नव्या तंत्रज्ञानावर काम केले जात आहे.

केंद्र सरकारच्या या नव्या तंत्रज्ञानानुसार राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरील खतांचा पुरवठा, उपलब्धता आणि त्याची गरज याबाबतचा तपशील देण्यात आला आहे. ''या नव्या योजनेसाठी सरकारने पीओएस सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन, लॉग-इनदरम्यान आधार व्हर्च्युअल ओळखीच्या पर्यायासह विविध भाषेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे'', असे रसायन आणि खते मंत्रालयाचे सचिव छबीलेंद्र राऊळ यांनी सांगितले.

तसेच मातीची गुणवत्ता कार्डाची शिफारस, शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या खताचे आकडेही सहजपणे उपलब्ध केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com