#MeToo एम. जे. अकबर यांची उलटतपासणी 

पीटीआय
रविवार, 5 मे 2019

माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप पत्रकार प्रिया रामानी यांनी "मी टू' चळवळीत सहभागी होत केला होता.

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप पत्रकार प्रिया रामानी यांनी "मी टू' चळवळीत सहभागी होत केला होता. याप्रकरणी दिल्ली न्यायालयात अकबर यांचा जबाब शनिवारी नोंदविण्यात आला असून, त्यांची उलटतपासणीही घेण्यात आली. 

अकबर हे आज अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाले. न्यायालयात दोन तास त्यांनी उलटतपासणी झाली. रामानी यांनी केलेले आरोप हे द्वेषातून व बदनामीच्या हेतूने केले आहेत, असे अकबर यांनी सांगितले.

रामानी यांनी "एशियन एज'मध्ये काम करण्यास सुरवात केल्यानंतर सर्व तपशिलाबाबत वरिष्ठ वकील रिबेका जॉन यांनी त्यांची उलटतपासणी घेतली. या वेळी अकबर यांनी बहुतेक प्रश्‍नांवर "मला आठवत नाही,' असे साचेबद्ध उत्तर दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cross Examination of MJ Akbar in Case of MeToo

टॅग्स