बीएसएफ भरतीसाठी महिलांची गर्दी 

पीटीआय
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

जम्मू - जम्मू आणि काश्‍मीरमध्ये सध्या लष्कर भरतीची प्रक्रिया सुरू असून शनिवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) भरती मोहिमेसाठी जम्मूमध्ये शेकडो महिला उमेदवार दाखल झाल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

जम्मू-काश्‍मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर बीएसएफने आयोजित केलेली ही पहिलीच सैन्य भरती मोहीम असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी या प्रक्रियेसाठी शेकडो महिला दाखल झाल्या असून या महिला जम्मूसह काश्‍मीरच्या खोऱ्यामधील गावांमधील असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. बीएसएफने 16 नोव्हेंबर पासून राज्याच्या अनेक भागांमध्ये भरती मोहीम सुरू केली आहे. 

बीएसएफमध्ये जाण्याचे माझे स्वप्न आहे. माझ्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याच्या निर्णयाचे माझ्या कुटुंबातील सदस्यांनी समर्थन केले आहे. आयुष्याच्या सर्व क्षेत्रात मुलींशी समान वागणूक मिळावी अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे मी या प्रक्रियेत सहभागी झाले आहे. असे एका महिला उमेदवाराने सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crowd of women for BSF recruitment