पर्यटक महिलेची छेडछाडप्रकरणी सीआरपीएफ जवानाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

काही अंतरावर संशयित राजवीर सिंग हा सुद्धा पाण्यात उतरला होता. काही वेळाने तो पर्यटक महिलेच्या जवळ येऊन तिला हात लावला तसेच तिच्याशी अश्लिल वर्तन केले.

गोवा - कळंगुट येथील समु्द्रकिनारी एका पर्यटक महिलेची छेडछाड व तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) जवान राजवीर प्रभूदयाळ सिंग (43 वर्षे) याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4 च्या सुमारास पर्यटक जोडपे आपल्या मुलांसह कळंगुट समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले होते. काही अंतरावर संशयित राजवीर सिंग हा सुद्धा पाण्यात उतरला होता. काही वेळाने तो पर्यटक महिलेच्या जवळ येऊन तिला हात लावला तसेच तिच्याशी अश्लिल वर्तन केले. याप्रकरणी तिच्या पतीने जाब विचारला म्हणून त्याने त्यालाही मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास महिला उपनिरीक्षक सपना गावस करत आहे. ही घटना काल 12 फेब्रुवारीला संध्याकाळी उशिरा घडली.

Web Title: CRPF jawan arrested for woman harassment