मरेन पण पाक जिंदाबाद बोलणार नाही...

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

संबलपूर (ओरिसा)- जम्मू-काश्‍मीरमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना स्थानिकांनी मारहाण करतानाच 'पाक जिंदाबाद' असे बोलण्यास सांगत होते. युवकांना एकच सांगितले देशासाठी लढतोय... मरेन पण पाकि जिंदाबाद बोलणार नाही, असे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान विक्की विश्वकर्मा यांनी सांगितले.

संबलपूर (ओरिसा)- जम्मू-काश्‍मीरमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना स्थानिकांनी मारहाण करतानाच 'पाक जिंदाबाद' असे बोलण्यास सांगत होते. युवकांना एकच सांगितले देशासाठी लढतोय... मरेन पण पाकि जिंदाबाद बोलणार नाही, असे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान विक्की विश्वकर्मा यांनी सांगितले.

काश्‍मीरमध्ये पोटनिवडणूकीच्या बंदोबस्तावरून केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान एव्हीएम घेऊन परतत होते. यावेळी स्थानिक फुटीरतावादी टोळक्‍याने जवानांशी गैरवर्तन केले होते. काही तरुण या जवानांवर हल्ला करत लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करत होते. सशस्त्र असलेल्या जवानांनी संयम पाळत आपले कर्तव्य पार पाडण्याकडे लक्ष दिले. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी काश्मीरी युवकांवर टीका केली होती. विशेष म्हणजे गैरवर्तन करणाऱयांनीच व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर अपलोड केला आहे.

काश्मीरमध्ये मारहाण झालेल्या जवानांमध्ये 26 वर्षीय विश्वकर्मा यांचाही समावेश होता. विश्वकर्मा यांनी सांगितले की, 'आमच्या पथकाकडे ईव्हिएम मशिनच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती. बडगाम जिल्ह्यात आमच्यावर स्थानिक युवकांनी अत्याचार करण्यास सुरवात केली. परंतु, आम्ही शांत राहात त्यांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. युवक दगडफेक करत असतानाच पाकिस्तान जिंदाबाद बोलत होते. एका युवकाने जवळ येऊन थप्पड लगावली. पाक जिंदाबाद बोलण्यासाठी आमच्यावरही दबाव आणत होते. परंतु, आम्ही देशासाठी लढत आहोत, देशासाठी मरणाला सामोरे जाऊ. पण, पाक जिंदाबाद असे कधीच बोलणार नाही.'

स्थानिक युवकांकडून होत असलेल्या अत्याचाराबाबतची माहिती कंट्रोल रूमला दिली होती, असे गावी सुटीवर आलेले जवान विश्वकर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना स्थानिकांनी जवानांशी केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, जवानांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत दाखविलेल्या संयमावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Web Title: crpf jawan assualted in kashmir speaks out