जम्मूमध्ये सीआरपीएफच्या जवानाचा गूढ मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

जम्मू - येथील अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका जवानाचा गोळी लागून गूढ मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

केंद्रीय राखीव पोलिस दलाचे हवालदार शिव कुमार (वय 34) हे 76 बटालियनचे जवान होते. आज (गुरुवार) सकाळी अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये ते मृतावस्थेत आढळले. कुमार यांचा मृत्यू त्यांच्याच सर्व्हिस रायफलमधून गोळी लागून झाल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

"त्यांच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा आढळून आल्या. हा मृत्यु म्हणजे आत्महत्या होती की अपघाताने गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला याचा तपास घेण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे', अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Web Title: CRPF jawan dies of gun shot in Jammu