पुलवामामध्ये चकमकीत जवान हुतात्मा; दहशतवादी पळाले

वृत्तसंस्था
शनिवार, 12 मे 2018

पुलवामा : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला. मात्र, नागरिकांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले.

पुलवामा जिल्ह्यातील बरगाम गावात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाल्यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), राष्ट्रीय रायफल्स, विशेष पथक आणि पोलिसांनी संयुक्तरित्या शोधमोहिम राबविली. दहशतवाद्यांनी जवानांवर केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन घरांचे नुकसान झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी जवानांवर केलेल्या दगडफेकीमुळे दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले.

या गोळीबारानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, शोधमोहिम राबविण्यात येत आहे. काश्मीरमध्ये लष्करी जवानांवर सतत दगडफेकीच्या घटना घडत आहेत. नुकतेच शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये काश्मीर विद्यापीठातील एका प्राध्यापकाचाही समावेश होता. 

Web Title: CRPF Jawan Killed In Encounter In Pulwama Terrorists Escape