सीआरपीएफ जवानाकडून 3 सहकाऱ्यांवर गोळीबार

udhampur
udhampur

श्रीनगर : जम्मू कश्मीरमधील उधमपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने तीन सहकाऱ्यांवर गोळ्या मारून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत त्याने गोळ्या झाडलेल्या तीन सहकाऱ्यांचा मृत्यू झाला असून गोळ्या झाडणाऱ्या जवानाची प्रकृती गंभीर आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जवानावर उधमपूरमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहकाऱ्यांशी झालेल्या वादाच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीआरपीएफच्या 187 बटालियनमधील हे चार जवान आहेत. उधमपूरमधील बट्टल बालियान लष्करी तळावर जवानाचा तीन सहाकाऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर जवानाने तीन सहाकाऱ्यांवर गोळ्या झाडून स्वतःवरही गोळ्या झाडल्या. मात्र, त्यांच्यात नेमका कशावरून वाद झाला होता, याची माहिती मिळालेली नाही.

उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवाशी असलेल्या कॉन्स्टेबल अजीत कुमारने राजस्थानच्या झुनझुनमधील रहिवासी असणाऱ्या हेड कॉन्स्टेबल पोखरमल, दिल्लीच्या मौजपूरमधील रहिवाशी हेड कॉन्स्टेबल योगेंद्र शर्मा आणि हरियानाच्या रेवाडीतील हेड कॉन्स्टेबल उम्मीद सिंह या तिघांवर गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्याने स्वतःलाही गोळी मारून घेतली. गोळी मारलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अजीत कुमारची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने खळबळ उडाली असून सीआरपीएफ जवानांमधील वाढत्या ताणतणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com