'राजनाथसिंह, श्रद्धांजली नको, जवानांचे दुःख समजून घ्या'

टीम ई सकाळ
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

तेव्हा तुम्ही कुठे होता?
संरक्षणतज्ज्ञ टीव्हीवर चांगल्या, चांगल्या गोष्टी बोलतात की, जवानांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही. मग पाकिस्तानी सैन्याने तुमच्या जवानांचे शीर कापून नेले तेव्हा तुम्ही कुठे होता? पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला तेव्हा तुम्ही कुठे होता? माध्यमांनी अशा तज्ज्ञांना विचारण्यापेक्षा सुकमामध्ये जाऊन तिथल्या जवानांना विचारले तर नेमकी समस्या काय आहे ते कळेल. छत्तीसगढ सरकार रस्ते बनवते, श्रेय घेते आणि जवान हुतात्मा होतात. 

नवी दिल्ली : 'राजनाथसिंह तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर तुम्ही केवळ हुतात्म्यांच्या मृतदेहांना श्रद्धांजली वाहू नका. त्यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली द्याल तेव्हा त्यांना बरं वाटेल,' असे सुनावत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका जवानाने देशवासीयांनी जवानांचे दुःख समजून घ्यावे, असे आवाहन केले आहे. 

सुकमा हल्ल्याने उद्विग्न झालेल्या (CRPF) एका जवानाने आपल्या सैनिकांच्या व्यथा मांडत सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना लक्ष्य करीत त्याने सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात CRPFचे 25 जवान हुतात्मा झाले आहेत. तसेच आणखी काही जवान बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर जवान मिश्रा यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

'राजनाथसिंह आपण एक चांगला नेता म्हणून स्वतःला सिद्ध करू शकलेला नाहीत. तुमच्या राज्यात CRPF जवान लाठ्या खात आहेत, हुतात्मा होत आहेत,' असे सांगत जवान पंकज मिश्रा यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. 

तुम्हाला नव्हे, मोदींना मत दिले
ते म्हणतात की, 'हेच CRPFचे जवान अमित शहांपासून अनेक नेत्यांना एक्स, वाय, झेड दर्जाची सुरक्षा पुरवत आहेत. मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की, राजनाथसिंहजी आम्ही तुम्हाला किंवा भाजपला मत दिलेले नाही, तर मोदींना मत दिले आहे. मात्र, तुमच्यासारखे मोदींना योग्य माहिती देत नाहीत, निर्णय घेत नाहीत. 

सुपडासाफ करा
CRPFच्या जवानांवर तीनशे जणांच्या गटाने अचानकपणे हल्ला केला. त्यामध्ये 200 महिला होत्या ही अत्यंत दुःखद बाब आहे. त्यामध्ये आपले बटालियन क्रमांक 74 चे जवान मारले गेले. आम्हाला असे समजले की महासंचालक तिथे जाऊन भेट देणार आहेत. मी त्यांना सांगून इच्छितो की, तिथे जाऊन काहीही फायदा नाही. त्यापेक्षा तिथे जवानांच्या एक-दोन नव्हे तर 20 - 25 बटालियन पाठवा आणि सुकमामध्ये पूर्णपणे सुपडासाफ करून टाका. 

जवानांनो आवाज उठवा
काश्मीरमध्ये शाळा सुटल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी जवानांवर हल्ला केला, तर दुसरीकडे सुकमामध्ये हुतात्मा झाले तेही CRPFचे जवानच होते. मी जवानांना सांगू इच्छितो की तुम्ही आवाज उठवत नाही त्याचा हा परिणाम आहे. तो गेला जाऊ द्या, असा विचार करत असाल तर एकेक करून सर्वजण मारले जातील. मग विचार करू नका की काय कमतरता राहिली
 

Web Title: crpf jawan slams rajnath singh, says voted for

व्हिडीओ गॅलरी