सीआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या तरुणाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जून 2018

केंद्रीय राखीव सुरक्षा दल (एसआरपीएफ) आणि दगडफेक करणारा जमाव यांच्यात झालेल्या हिंसाचारात एसआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैसर अहमद भट्ट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याला शेर-ए-काश्मिर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआईएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव सुरक्षा दल (एसआरपीएफ) आणि दगडफेक करणारा जमाव यांच्यात झालेल्या हिंसाचारात एसआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैसर अहमद भट्ट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याला शेर-ए-काश्मिर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआईएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे वातावरण आणखी तणावपुर्ण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून काही काळापुरते श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. नौहट्टा येथे शुक्रवारी सरकार विरोधी निदर्शने करताना कैसर अहमद (वय 21) सीआरपीएफच्या गाडीखाली येऊन गंभीर जखमी झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काही काळापुरती बंद करण्यात आली आहे. ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवेचा वेगही कमी करण्यात आला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आणखी द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल केल्या जातात. यामुळे आणखी हिंसा होण्यीची शक्यता असते. उत्तर काश्मिरमधील बारामूल्ला आणि जम्मूमधील बनिहाल भागातील रेल्वे सेवा दिवसभरासाठी रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाकडून मोबाईल कंपन्यांना सेवा स्थगित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

 

Web Title: crpf motor crush youth