सीटीईटी परीक्षा वीस भाषांतून होणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ही 20 भारतीय भाषांत घेण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीबीएसईला दिले आहेत.
 

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ही 20 भारतीय भाषांत घेण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीबीएसईला दिले आहेत.

सीबीएसईने परीक्षेच्या पर्यायी यादीतून तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, गुजराती, बंगाली यांसह 17 भाषा वगळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावर टीका झाल्याने जावडेकर यांनी वीस भाषांत प्रवेश परीक्षा होणार असल्याचे सांगितले. या संदर्भात जावडेकर यांनी ट्विट केले आहे.

प्रवेश परीक्षा ही इंग्लिश, हिंदी, आसामी, बांगला, गारो, गुजराती, कन्नड, खासी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, मिझो, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, तिबेटियन, उर्दू भाषेत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तत्पूर्वी द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनी सीबीएसईच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 
 

Web Title: CTET Exam In 20 Languages