सांस्कृतिक आदानप्रदानासाठी महाराष्ट्र-ओडिशा यांच्यात करार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि ओडिशा यांच्यातील सांस्कृतिक आदानप्रदानाच्या वृद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. या करारांतर्गत दोन्ही भाषांतील पुस्तके, चित्रपट, नाटके आदींची भाषांतरे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली, नागरिकांचा परस्परांच्या राज्यांशी थेट संपर्क वाढविणे, दोन्ही राज्यांतील पाककलांचा खाद्यमहोत्सव महोत्सव आदी उपक्रमांचा समावेश आहे.

"एक भारत, श्रेष्ठ भारत' या मोदी यांच्या संकल्पनेनुसार राज्याराज्यांत असे सांस्कृतिक करार केले जात आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि ओडिशाच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव गगनकुमार धल यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी मोदी यांच्यासह गृहमंत्री राजनाथसिंह, सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा हेही हजर होते.

या करारानुसार दोन राज्यांमध्ये कलापथकांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाणघेवाण होणार आहे. साहित्य तसेच दोन राज्यांच्या भाषेतील समान अर्थाच्या म्हणींचा तसेच परस्परांच्या साहित्यकृतींचा, नाट्यकृतींचा अनुवाद करणे, चित्रपट व साहित्यिक मेळावे घेणे, पाककला महोत्सव भरविणे, दोन्ही राज्यांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींचे नियोजन, अभ्यागतांच्या निवासव्यवस्था करण्यात येईल. पर्यटकांसाठी राज्यदर्शन कार्यक्रमाला चालना मिळेल. एका राज्यातील पर्यटक चालकासाठी परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल. दोन्ही राज्यांची संस्कृती, प्रथा, परंपरा, वनस्पती व प्राणिजीवन इत्यादी माहितीचे पुस्तक काढणे, उडिया व मराठीच्या अध्ययनासाठी शआळा-महाविद्यालयांत विशेष वर्ग सुरू करणे तसेच निबंध व छायाचित्र स्पर्धांचे आयोजन करणे आदींचा करारात समावेश आहे. त्याचप्रमाणे दोन्ही राज्यांत "एक भारत श्रेष्ठ भारत' संकेतस्थळावर ब्लॉग स्पर्धेचे आयोजन करण्याचीही तरतूद करारात आहे.

Web Title: cultural sharing agreement between maharashtra and odisha