जम्मूत संचारबंदी कायम

जम्मूत संचारबंदी कायम

जम्मू : पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना जम्मूतही तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराच्या नऊ तुकड्यांना पाचारण करण्यात आले असून, संवेदनशील भागात लष्कराचे ध्वजसंचलनही घेण्यात आले. 

पुलवामा हल्ल्यानंतर शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याने शुक्रवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे जम्मू विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच, शहरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली. रामबण येथे दरड कोसळल्यामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कालांतराने सुरक्षाव्यवस्थेत वाहनांना सोडण्यात आले. संचारबंदीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहरात कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस शहरातील स्थितीवर लक्ष ठेवून असून, संचारबंदीत शिथिलता आणण्याबाबत विचार केला जात आहे.

शहरात काही भागांत आज लष्कराने ध्वजसंचलन केले. जम्मू चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने पाकिस्तानविरोधात आंदोलन करण्यात आले आणि बंदचे आवाहन करण्यात आले होते. तसेच, काल रात्री हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यासाठी "कॅंडल मार्च'चे आयोजन करण्यात आले होते.

पुलवामा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात शुक्रवारी हिंसाचार उसळला होता. नागरिकांनी दगडफेक केली होती, तसेच वाहनेही पेटवून देण्यात आले. या दगडफेकीत पोलिस कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com