श्रीनगरमधील संचारबंदी उठविली; जमावबंदी लागू

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

श्रीनगर - श्रीनगरमधील संचारबंदी शनिवारी उठविण्यात आली. त्यामुळे नागरिक त्यांचे दैनंदिन व्यवहार करण्यास बाहेर पडू शकले, तर वाहतूकही सुरू झाली. मात्र संपूर्ण काश्‍मीर खोऱ्यात जमावबंदीचा आदेश लागू आहे.

श्रीनगर - श्रीनगरमधील संचारबंदी शनिवारी उठविण्यात आली. त्यामुळे नागरिक त्यांचे दैनंदिन व्यवहार करण्यास बाहेर पडू शकले, तर वाहतूकही सुरू झाली. मात्र संपूर्ण काश्‍मीर खोऱ्यात जमावबंदीचा आदेश लागू आहे.

फुटीरतावादी संघटनांतर्फे शहरातील नौहाटा भागातील जमिया मशिदीपर्यंत शुक्रवारी (ता. 28) मोर्चा काढण्यात येणार होता. त्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस स्थानकाअंतर्गत काल संचारबंदी जाहीर केली होती. आज परिस्थितीत सुधारणा झाल्याने ती उठविण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. नागरिकांनी बाहेर पडण्यास राज्यात कोठेही निर्बंध घातलेले नाहीत; मात्र सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास बंदी आहे. संचारबंदी उठली असली तरी फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे आज 113 व्या दिवशीही येथील जनजीवन विस्कळित झाले होते.

Web Title: Curfew of Shrinagar cancelled