बनावट नोटांच्या तस्करीला नोटाबंदीमुळे आळा - किरण रिज्जू

पीटीआय
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्यामुळे जम्मू आणि काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांना आणि दगडफेक करणाऱ्यांना आता पैसे मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे बनावट नोटांच्या तस्करीला मोठ्या प्रमाणात आळा बसल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांनी आज लोकसभेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि एक हजारच्या नोटा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे बनावट नोटांच्या तस्करीला आळा बसल्याचे त्यांनी येथे स्पष्ट केले. दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पैशावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे काश्‍मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांनाही पैसा मिळणे बंद झाले आहे, असे रिज्जू यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात लोकसभेत सांगितले. जम्मू आणि काश्‍मीरमधील फुटीरतावाद्यांना देशात विस्कळितपणा आणण्यासाठी उत्स्फूर्त केले जात असून, त्यातील काही जण पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा दावा रिज्जू यांनी या वेळी केला.

देशात गडबडी निर्माण करण्यासाठी शेजारील देशाकडून प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. फुटीरतावाद्यांचे काही नेते हे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कायद्याच्या आधारे त्यांना रोखण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलण्यात येत असल्याचे रिज्जू यांनी सांगितले.

Web Title: currency ban prevent smuggling of fake currency