मुस्लिम असल्याने ऑर्डर रद्द करणाऱ्याला झोमॅटोकडून परफेक्ट उत्तर

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

झोमॅटोवरून पंडीत अमित शुक्ला या एका हिंदू तरुणाने जेवणाची ऑर्डर दिली होती. पण, ऑनलाइन ऑर्डर केलेले जेवण पोहोचवण्यासाठी मुस्लिम तरुण आल्याचे कारण देऊन दिलेली ऑर्डर त्याने रद्द केली. या हिंदू व्यक्तीने आपली ऑर्डर रद्द करण्याचा इशारा ट्विटरद्वारे झोमॅटोला दिला होता. त्यावर आम्ही डिलिव्हरी बॉय बदलणार नाही असे झोमॅटोने स्पष्ट केल्यानंतर या व्यक्तीने त्याची ऑर्डर रद्द केली

नवी दिल्ली : फुड डिलिव्हरीत अग्रेसर असलेल्या झोमॅटोने एका ग्राहकाला दिलेले उत्तर पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑर्डर पोहोचविण्यासाठी मुस्लिम तरूण आल्यान ऑर्डर रद्द करणाऱ्याला झोमॅटोने अन्नाला धर्म नसतो, असे उत्तर दिले आहे.

झोमॅटोवरून पंडीत अमित शुक्ला या एका हिंदू तरुणाने जेवणाची ऑर्डर दिली होती. पण, ऑनलाइन ऑर्डर केलेले जेवण पोहोचवण्यासाठी मुस्लिम तरुण आल्याचे कारण देऊन दिलेली ऑर्डर त्याने रद्द केली. या हिंदू व्यक्तीने आपली ऑर्डर रद्द करण्याचा इशारा ट्विटरद्वारे झोमॅटोला दिला होता. त्यावर आम्ही डिलिव्हरी बॉय बदलणार नाही असे झोमॅटोने स्पष्ट केल्यानंतर या व्यक्तीने त्याची ऑर्डर रद्द केली आणि पुन्हा एकदा झोमॅटोला ट्विटरद्वारे मला माझे पैसे देखील परत नको पण मी ऑर्डर रद्द करत असल्याचे कळविले. 

त्यावर झोमॅटोने परफेक्ट उत्तर दिले. झोमॅटोने म्हटले आहे, की अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म असतो. या ट्विटमुळे तरुणाची बोलतीच बंद केली. त्याने त्यावर काहीही उत्तर दिले नाही. झोमॅटोचे हे उत्तर अनेकांना भावले असून, झोमॅटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री स्वरा भास्करनेही झोमॅटोचे कौतुक केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Customer cancels Zomato order for sending non-Hindu delivery boy