'छप्पर फाड' डिस्काउंटमुळे वाहनखेरदीसाठी ग्राहक सुसाट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

नवी दिल्ली / मुंबई  : बीएस-३ प्रकारातील वाहनांचा साठा असल्याने आज शुक्रवारी ३१ मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने घेतला आहे. 

नवी दिल्ली / मुंबई  : बीएस-३ प्रकारातील वाहनांचा साठा असल्याने आज शुक्रवारी ३१ मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्रातील आॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने घेतला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील 'बीएस-3' मानकांच्या वाहनविक्री आणि नोंदणीवर बंदी घातल्यानंतर गुरुवारी विविध वाहन कंपन्यांनी आपली उत्पादने खपविण्यासाठी त्यांच्या खरेदीवर तब्बल बारा ते वीस हजार रुपयांपर्यंतची भरघोस सूट देऊ केली होती. ग्राहकांनीदेखील या सुवर्णसंधीचा लाभ घेत गाड्या खरेदी करण्यासाठी शोरूमबाहेर अक्षरश: रांगा लावल्या होत्या. अनेक ठिकाणी तर काही तासांच्या आत वाहने हातोहात संपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हीरो, मोटोकॉर्प, होंडा, स्कूटर इंडियासारख्या कंपन्यांनी दुचाकी वाहनांच्या विक्रीवर बंपर डिस्काउंट जाहीर केल्याने ग्राहकांनी पाडव्यानंतर दुसऱ्या दिवशी खरेदीची दिवाळी साजरी केली. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणकारी 'बीएस-3' मानकांच्या वाहनांचे इंजिन कायमचे बंद पाडल्याने वाहन कंपन्यांचे धाबे दणाणले होते. न्यायालयाच्या आदेशामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कंपन्यांनी आज वाहनांच्या खरेदीवर विशेष सूट देऊ केली होती. हीरो मोटोकॉर्प कंपनीने दुचाकी वाहनांच्या खरेदीवर वीस हजारांपर्यंतची सूट दिली होती, तर होंडा कंपनीने मोटारसायकल खरेदीवर साडेबारा हजार रुपये, स्कूटर इंडियाकडून 10 हजार रुपयांची सूट देण्यात आली. एक लाख रुपये किमतीच्या दुचाकी खरेदीवर पंधरा ते वीस हजार रुपयांची सूट देण्यात आली.

...तर धोका नाही
'बीएस-4' वाहनांचा नियम 1 एप्रिलपासून लागू होत असल्याने 'बीस-3' वाहनांची नोंदणी 31 मार्चपर्यंत झाल्यास अशा वाहनांना कोणताही धोका असणार नाही. आता 31 मार्चपूर्वी नोंदणी झालेली 'बीएस-3' वाहने रस्त्यावर धावू शकणार आहेत. ज्या वाहनांची नोंदणी 31 मार्च 2017 च्या आधी झालेली आहेत, अशी 'बीएस-3' वाहने वैयक्तिक पातळीवर विकता येतील.

या गाड्यांवर सूट
ज्यूपिटर : नऊ हजारांपर्यंत
व्हिक्‍टर : नऊ हजारांपर्यंत
स्कूटी : पाच हजारांपर्यंत
अपाची : नऊ हजारांपर्यंत
एक्‍स एल 100 : पाच हजारांपर्यंत
टीव्हीएस विगो : आठ हजारांपर्यंत
फिनिक्‍स : 12 हजारांपर्यंत
ऍक्‍टिव्हा '3 जी' : 13 हजारांपर्यंत
सीबीआर स्पोर्टस बाइक : 22 हजार हजारांपर्यंत
होंडा न्यू : 20 हजारांपर्यंत
ड्युएट, मेस्ट्रो एज, प्लेजर : 12 हजार 500 रुपयांपर्यंत
एचएफ डिलस्क सीरिज : 5 हजार रुपयांपर्यंत सूट
स्प्लेंडर प्लस : 5 हजार सूट
ग्लॅमर, एक्‍स्प्रो, आयस्मार्ट 100 : साडेसात हजारांपर्यंत
( टीप : ही सूट शहरे व विक्रेत्यांवर अवलंबून असून, त्यामध्ये बदल होऊ शकतात)

काल दिवसभरात

  • फायनान्स, कोटेशनसाठी ग्राहकांची धावाधाव
  • अनेक शहरांमधील स्टॉक सायंकाळी संपला
  • ग्राहकांकडून 'बीएस-3' वाहनांची चौकशी सुरूच
  • व्हॉट्‌सऍपमुळे डिस्काउंट ऑफर व्हायरल
  • वाहन विक्रेत्यांमध्ये नाराजी कायम

 

Web Title: customers jump on auto companies discounts