अम्फान वादाळाचा धोका; एनडीआरएफच्या ४१ तुकड्या किनाऱ्यावर दाखल

वृत्तसंस्था
बुधवार, 20 मे 2020

बंगालच्याउपसागरात निर्माण झालेलं अम्फान हे चक्रीवादळ आज बंगालचाउपसागर ओलांडून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.सर्तकतेच्या इशारा देण्यात आला आहे

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फान हे चक्रीवादळ आज बंगालचा उपसागर ओलांडून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्तकतेच्या इशारा देण्यात आला आहे. संकटाचा सामना करण्यासाठी एनडीआर एफच्या ४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये, पश्चिम मिदनापूर, साऊथ आणि नॉर्थ २४ परगणा, हावडा, हुगळी आणि कोलकाता या जिल्ह्यांमध्ये, तर ओदिशात, जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक, जजपूर आणि बालासोर या जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान होण्याचा इशारा, भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी सर्तकता घेण्यात येत आहे. तसेच, आसाम आणि सिक्कीमच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडेल असा इशाराही भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

वादळ देशाच्या पूर्व किनारपट्टीस धडकण्याचा इशारा  
बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले एम्फान चक्रीवादळ देशाच्या ईशान्य भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या वादळामुळे जोरदार वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. १९९९ नंतर प्रथमच याप्रकारचे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झाले असल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील प्रदेशास धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, एम्फान हे चक्रीवादळ या महिन्याच्या २० मे रोजी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या दरम्यान दिघा आणि हटिया येथे धडकण्याची शक्यता असल्याचे म्हंटले आहे. तर सध्या या चक्रीवादळामुळे समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी २०० ते २४० किमी प्रतितास असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले. एम्फान हे चक्रीवादळ उत्तर वायव्य दिशेकडे वाटचाल करीत आहे.

पिंपरीच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclone Amphan is expected to hit the coasts of West Bengal and Bangladesh

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: