‘बुलबुल’चा ईशान्य भारत, बांगलादेशला फटका; हजारो जण सुरक्षितस्थळी

वृत्तसंस्था
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

'बुलबुल' चक्रीवादळ हळूहळू कमकुवत होईल 
वायव्य व पश्‍चिम बंगालच्या खाडीत तयार झालेले 'बुलबुल' चक्रीवादळ हळूहळू कमकुवत होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. या चक्रीवादळाचा गोपालपूर, पारादीप आणि कोलकता येथील हवामान विभागांकडून मागोवा घेतला जात असल्याची माहिती हवामान विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. 

कोलकता : बंगालच्या उपसागरातील ‘बुलबुल’ अतितीव्र चक्रीवादळ ओडिशा, पश्‍चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनारपट्टीवर घोंघावत असून, आज (रविवार) सकाळी किनारपट्टीवर जोरदार वारे वाहताना दिसत आहे. हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. वादळामुळे बांगलादेशात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कोलकतामधील विमानसेवा विस्कळीत झाली आहे.

शनिवारी रात्री (ता. ९) पश्‍चिम बंगालच्या सागर बेट आणि बांगलादेशाच्या ‘खेपुपुरा’ किनाऱ्यादरम्यान धडकणाऱ्या वादळामुळे आज पूर्व किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यामध्ये तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ‘बुलबुल’ चक्रीवादळ ओडिशाच्या परादीपासून ९५ किलोमीटर, चांदबलीपासून १०० किलोमीटर अग्नेयेकडे, तर पश्‍चिम बंगालच्या सागर बेटापासून १४० किलोमीटर, तर बांगलादेशाच्या खेपुपारापासून ३२० किलोमीटर नैर्ऋत्येकडे होते. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आज सकाळी ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह जमिनीवर येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आजही चक्रीवादळाचा धोका कायम राहणार आहे. वादळाच्या प्रभावमुळे ओडिशा, पश्‍चिम बंगाल, झारखंड, बिहार, ईशान्येकडील राज्यासह बांगलादेशामध्ये ढगांची दाटी होत, किनारपट्टीलागत वादळी पावसाला सुरुवात झाली. 

'बुलबुल' चक्रीवादळ हळूहळू कमकुवत होईल 
वायव्य व पश्‍चिम बंगालच्या खाडीत तयार झालेले 'बुलबुल' चक्रीवादळ हळूहळू कमकुवत होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. या चक्रीवादळाचा गोपालपूर, पारादीप आणि कोलकता येथील हवामान विभागांकडून मागोवा घेतला जात असल्याची माहिती हवामान विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclone Bulbul kills at least 2 as Bangladesh, India evacuate hundreds of thousands