जवाद चक्रीवादळाचा जोर कमी, ओडिसासह बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

jawad cyclone
jawad cycloneesakal

नवी दिल्ली : जवाद चक्रीवादळाचा (Jawad Cyclone) जोर कमी झाला असून आज दुपारी पुरी येथील किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. पण, या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या (IMD) वतीने देण्यात आला आहे.

jawad cyclone
Cyclone Jawad : पश्चिम बंगालमध्ये NDRF ची 8 पथके तैनात

सध्या हे चक्रीवादळ वायझॅकच्या पूर्व ईशान्येस २३० किमी, गोपालपूरच्या दक्षिण-नैऋत्य दिशेस १३० किमी, पुरीच्या दक्षिण-नैऋत्य दिशेस १८० किमी, पारादीपच्या दक्षिण-नैऋत्येस २७० किमी दूर आहे. ते हळूहळू शांत होत जाईल आणि पुरी किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने सांगितले आहे. ओडिशातील गंजम, पुरी, खोरडा, जगतसिंगपूर, केंद्रपारा, कटक या जिल्ह्यांच्या काही भागांत पुढील तीन तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच बंगालच्या दीघा समुद्रकिनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळत असून येथील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या ३० नोव्हेंबरला अंदमान येथील समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं. हे क्षेत्र पश्चिम बंगालकडे सरकून त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले होते. मात्र, आता या वादळाचा प्रभाव कमी होत असून आज पुरीच्या किनाऱ्यावर धडकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com