येडियुरप्पांच्या नावात 'डी'ऐवजी आता 'आय'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ आज घेतली. यापूर्वी त्यांनी त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केल्याचे दिसून आले.

बंगळूर ः भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ आज घेतली. यापूर्वी त्यांनी त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केल्याचे दिसून आले.

सरकार स्थापनेसाठी दावा करणारे पत्र त्यांनी राज्यपाल वजूभाईवाला यांच्याकडे आज सकाळी सोपविले. त्यात त्यांनी त्यांचे नाव "B. S. Yeddyurappa' असे न लिहिता "B. S. Yediyurappa' असे लिहिले आहे. राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीपासून येडियुरप्पा यांनी त्यांच्या नावाचे स्पेलिंग "Yediyurappa' असे लिहिले होते. या नावानेच त्यांनी 1975मध्ये पहिली निवडणूक लढविली होती.

तसेच, 2007मध्ये ते सात दिवसांचे मुख्यमंत्री बनले तेव्हाही असेच स्पेलिंग लिहीत असत. नंतर मात्र अंक ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्पेलिंगमध्ये बदल करीत "आय'च्या जागी "डी' अक्षर लिहिण्यास सुरवात केली. त्यानुसार त्यांच्या नावाचे स्पेलिंग "B. S. Yeddyurappa' असे झाले. मात्र आजच्या पत्रात त्यांनी पूर्वीप्रमाणेच "B. S. Yediyurappa' असे नाव लिहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: D Out I In Yediyurappa Not Yeddyurappa, Took Oath as Karnataka CM Today