वडिलांनी विमान उडविले; अन् राहुल गांधी...

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

कानपूर- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वडिलांनी (राजीव गांधी) विमान उडविले अन् पोरगं पंक्चर सायकल ढकलतोय, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सतीश महाना यांच्या प्रचारादरम्यान काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, 'राहुलच्या वडिलांनी विमान उडविले आणि राहुल गांधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पंक्चर झालेल्या सायकली ढकलतोय.'

'आमच्या बहिणींपैकी एक असलेल्या (बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती) बहिणीने भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे मुस्लिम बांधवांनी महाना यांच्या पाठीशी उभे रहावे,' असेही साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या.

Web Title: 'Dad used to fly planes, Rahul pushing punctured cycle'