रोख रक्कम नसल्याने मृतदेह ठेवला रस्त्यावर

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

नोईडा- दिल्लीमध्ये मजुरीचे काम करणाऱया वृद्धाकडे पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळ पैसे नसल्याने त्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवला. पोलिसांच्या मदतीने शेवटी अंत्यसंस्कार करण्यात आले.

नोईडा- दिल्लीमध्ये मजुरीचे काम करणाऱया वृद्धाकडे पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळ पैसे नसल्याने त्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवला. पोलिसांच्या मदतीने शेवटी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुन्नी लाल यांच्या पत्नीचे (फुलमती देवी) उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. उपचारावेळीच मुन्नी लाल यांच्याकडील रक्कम खर्च झाली होती. बॅंकेतील खात्यावर 16 हजार रुपये शिल्लक होते. बॅंकेत रक्कम उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पैसे मिळू शकले नाहीत. यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे अवघड झाले होते. उत्तर प्रदेशातून त्यांचा मुलगा येणार होता. यामुळे त्यांनी मृतदेह रस्त्यावरच ठेवला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तिन पोलिसांनी मिळून अडीच हजार रुपये दिले. शिवाय, एका समाजसेवकाने पाच हजार रुपये दिले. यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

'पत्नीच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी माझ्यावर ही वेळ येईल, असे कधी वाटले नव्हते. परंतु, पोलिसांमधील माणुसकी व एका समाजसेवकाने दिलेल्या पैशानंतर अंत्यंसंस्कार करण्यात आले,' असे मुन्नीलाल यांनी सांगितले.

Web Title: daily wager had to wait to cremate wife