'दक्ष ऍप'मुळे कामचुकार कंत्राटदारांना दणका

'दक्ष ऍप'मुळे कामचुकार कंत्राटदारांना दणका

नवी मुंबई : शहरातील नागरिकांना गुळगळीत रस्ते, विनाखंडित पाणी पुरवठा, न तुंबणाऱ्या मलःनिस्सारण वाहिन्या अशा दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिकेने तयार केलेले 'दक्ष ऍप' ही ऑनलाईन प्रणाली प्रभावी ठरत आहे.

रस्त्यांवर पडलेले खड्डे असोत वा तूंबलेले पाणी संबंधित कंत्राटाराने केलेल्या कामाचे छायाचित्र काढून या ऑनलाईन प्रणालीत टाकण्याचे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी बंधनकारक केले आहे. रामास्वामींच्या या बंधनामुळे पहिल्या पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे तात्काळ दुरूस्त करण्यात आले आहेत. तर पाणी पुरवठा, मलःनिस्सारण व सांडपाणी प्रक्रिया आदी विभागातील कामचुकार 28 कंत्राटदारांना सुमारे 4 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. 

सायबर सिटी म्हणून नावलौकिक असलेल्या नवी मुंबई शहराला आता स्मार्ट सिटी म्हणून संबोधले जात आहे. नावाप्रमाणे प्रशासकीय कामांमध्ये व सुविधा देण्यातही स्मार्टनेस यावा याकरीता रामास्वामी यांनी खास एक ऑनलाईन प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीत रस्ते, पाणी पुरवठा, मलःनिस्सारण व सांडपाणी प्रक्रिया कामे करणाऱ्या कंत्राटदारांचा समावेश केला आहे. या कंत्राटदारांच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना दैंनदिन केल्या जाणाऱ्या विकास कामांचा लेखाजोखा छायाचित्रांसहित ऍपमध्ये टाकायचा आहे.

कंत्राटदारांनी केलेली कामे अभियंत्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तपासणी करायचे आहे. यात कामाचा दर्जा पडताळून पूर्ण झालेल्या कामाचे छायाचित्र काढून ते या ऑनलाईन प्रणालीवर टाकायचे आहेत. विशेष म्हणजे अभियंते व कंत्राटदारांच्या छायाचित्रांना जीपीएस टॅगींग असल्यामुळे दोघांनाही खोटेपणा केल्यास पकडले जाणार आहे.

तसेच कंत्राटदाराने छायाचित्र टाकल्यानंतर अवघ्या आठ तासांच्या आत संबंधित अभियंत्याला त्यावर प्रतिसाद द्यायचा आहे. तसे न केल्यास अभियंत्याला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. तर नियमित छायाचित्र न अपलोड करणाऱ्या कंत्राटदाराला देयकेच मिळणार नाही अशी तरतूद रामास्वामी यांनी केली आहे.

जून महिन्यापासून रामास्वामी यांनी ऑनलाईन प्राणलीवर छायाचित्रासहित कामांचा आढावा घेण्यास सुरवात केली. त्यानुसार आत्तापर्यंत 28 कंत्राटदारांना 4 लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. हा दंड कंत्राटदारांच्या महिन्याच्या देयकातून अदा केला जाणार आहे. तसे परीपत्रकच रामास्वामी यांनी काढले आहे. 

रस्त्यांच्या कामांवर प्रभाव 

महापालिकेने सुरू केलेल्या दक्ष ऍप्सवर आत्तापर्यंतच्या दीड महिन्याच्या कालावधीत रस्ते दुरूस्ती व देखभाल करणाऱ्या एकाही कंत्राटदाराला दंड आकारण्यात आलेला नाही. ऑनलाईन प्रणालीवर रोजचे काम नोंदवायला लागत असल्याने रस्त्यांवर पडलेले खड्डे वेळीच बुजवले जात आहेत. दीड महिन्यात 63 लाख रूपयांची रस्ते दुरूस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र पाणी पुरवठा विभागाच्या कंत्राटदाराला 2 लाख 69 हजार, मलःनिस्सारण विभागातील कंत्राटदारांना 52 हजार, सांडपाणी प्रक्रीया केंद्राच्या कंत्राटदाराला अवघे पाच हजार असा दंड लागला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com