सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित संघटनांचे 'भारत बंद' आंदोलन

Bharat Band
Bharat Band

नवी दिल्ली : ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात विविध दलित संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. विशेषत:, पंजाबमध्ये 'हाय ऍलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पंजाबमधील सर्व शाळा-महाविद्यालये आणि बॅंका आज (सोमवार) बंद आहेत. तसेच, पंजाबमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने ऍट्रॉसिटीसंदर्भात काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. त्याला देशभरातील दलित संघटना, दलित नेत्यांनी विरोध केला होता. या निर्णयाचा निषेध म्हणून 'भारत बंद'ची हाक देण्यात आली होती. 

मेरठमध्ये आंदोलनकर्त्यांनी हिंसाचार केला. रस्त्यावरील वाहनांची त्यांनी तोडफोड केली. यात अनेक जण जखमी झाले आहेत. ओडिशातील संबलपूरमध्ये आंदोलनकर्त्यांनी रेल्वे वाहतूक रोखून धरली आहे. महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये 'भारत बंद'ला हिंसक वळण लागले. शहादा-पाडळदा बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांमध्ये 'भारत बंद'ला प्रतिसाद मिळाला. पुणे, मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये 'भारत बंद'चे फारसे पडसाद उमटले नाहीत. 

'भारत बंद'चे परिणाम 

  • मेरठमध्ये वाहनांची तोडफोड 
  • बिहारमध्ये रेल्वे वाहतूक रोखून धरली; महामार्गावरही 'रास्ता रोको' आंदोलन 
  • पंजाबमधील अमृतसरमध्ये सर्व रस्ते निर्मनुष्य; कडक सुरक्षा व्यवस्था तैनात 
  • केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार 
  • पंजाबमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com