'दंगल'चे यश: हरियाणा सरकारकडून आखाड्यांना मॅट्स

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

चंदीगड- अभिनेता आमिर खानची भूमिका असलेल्या 'दंगल' चित्रपटाच्या यशानंतर हरियाणा सरकारने राज्यातील 100 आखाड्यांना मॅट्स पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

एका पित्याला आपल्या मुलीला कुस्तीपटू बनविण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, हे दंगल चित्रपटातात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटाने मोठे यश मिळविले आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खत्तार यांनी कुस्तीपटूंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून, राज्यातील 100 आखाड्यांना मॅट्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गिता व बबिता या दोन कुस्तीपटू बहिणींच्या कहाणीवरून 'दंगल' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हरिणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खत्तार यांनी दोन बहिणींची भेट घेऊन कुस्तीपटूंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: 'Dangal' Effect: Haryana Government To Provide 100 Wrestling Mats For 'Akhadas'