गोव्यात 26 सेल्फी बंदी ठिकाणांचे फलक किनाऱ्यावर लावणार

अवित बगळे
सोमवार, 25 जून 2018

एकीकडे गोवा सरकार पावसाळी पर्यटनात उत्तेजन देण्यासाठी व्हाईट वॉल्टर राफ्टींग, गिरी भ्रमंती असे उपक्रम राबवत असताना जगभरातील पर्यटकांना खेचून आणणाऱ्या सुंदर किनाऱ्यावरील पर्यटकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याची वेळ सरकारवर अतिउत्साही पर्यटकांमुऴे आल्याचे दिसते.

पणजी : तमीळनाडूतील दोन पर्यटकांचा गोव्यातील किनाऱ्यांवर सेल्फी घेताना बुडून मृत्यू झाल्यानंतर अशी 26 धोकादायक ठिकाणे किनाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. अशा धोकादायक ठिकाणांवर सेल्फी घेणे जीवघेणे ठरू शकते असे इशारे देणारे फलक आता उभारण्यात येणार आहे.

गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचे काम दृष्टी मरीन या कंपनीकडे सोपवले आहे.  ही कंपनी गोव्याच्या १०५ किलोमीटर किनाऱ्यांवर हजारभर जीवरक्षकांकरवी समुद्रात उतरणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा पुरवली जाते. ७ जून ते ३० सप्टेंबर या काळात गोव्यात समुद्रात उतरण्यास बंदी घातलेली आहे. त्याकाळात हे जीवरक्षक किनाऱ्यावर गस्त घालतात. समुद्रात कोणी उतरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रतिबंध करतात. सकाळी सहा ते सायंकाळ सात अशी सेवा ते बजावतात.
असे असताना पहाटे समुद्रात उतरल्याने अकोल्यातील पाच पर्यटकांचा कळंगुट येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर जीवरक्षकांनी रात्रीच्या वेळी गस्त घालावी असे ठरवविण्यात आले होते. त्यानंतर सेल्फी घेताना तमीळनाडूतील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर आता २६ ठिकाणे सेल्फीसाठी धोकादायक असल्याचे फलक लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी अर्थातच समुद्रात जाऊन वा किनाऱ्यावरील धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास बंदी असेल.

एकीकडे गोवा सरकार पावसाळी पर्यटनात उत्तेजन देण्यासाठी व्हाईट वॉल्टर राफ्टींग, गिरी भ्रमंती असे उपक्रम राबवत असताना जगभरातील पर्यटकांना खेचून आणणाऱ्या सुंदर किनाऱ्यावरील पर्यटकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याची वेळ सरकारवर अतिउत्साही पर्यटकांमुऴे आल्याचे दिसते.

Web Title: danger selfie spot on Goa coast