जमावाचा दार्जिलिंगमध्ये सुरक्षा दलावर हल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

दार्जिलिंग: येथील तिस्ता व्हॅली परिसरात संशयित गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात पाच पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान गंभीररीत्या जखमी झाले, असे पोलिसांनी आज सांगितले.

येथून 40 किलोमीटरवर असलेल्या तिस्ता व्हॅलीमध्ये सुरक्षा दल शोधमोहीम राबविण्यास गेल्यानंतर काल रात्री त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. जमावाने सुरक्षा दलांवर दगड आणि पारंपरिक नेपाळी कुकरी यांनी हल्ला केला. त्यात पाच जवान गंभीर जखमी झाले. या जमावाच्या हल्ल्यातून जवानांना वाचविण्यात आले आणि नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

एका सामुदायिक हॉलला मंगळवारी आग लावल्यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाने परिसरात शोध मोहीम राबविण्यास सुरवात केली होती.

Web Title: darjeeling news attack on police