सर्वांसाठी डार्क चॉकलेट...शरीर व मन तंदुरुस्त राहत असल्याचा दावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

"चॉकलेटमधील कोकोचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास आम्ही प्रथमच केला. याचे परिणाम उत्साहवर्धक व सकारात्मक आले, असे बर्क यांनी सांगितले. या अहवालातील निष्कर्ष अमेरिकेतील सॅन दिऍगो येथे आयोजित केलेल्या "एक्‍सपिरिमेंटल बायोलॉजी 2018' या परिषदेत मांडण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली : चॉकलेट न आवडणारी व्यक्ती सापडणे मुश्‍किलच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत चॉकलेट म्हटले की तोंडात पाणी सुटते. आता जगभरातील चॉकलेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आली आहे. डार्क चॉकलेट खाल्ल्याने मनावरील ताण हलका होतो व दाह कमी होते. तसेच स्मरणशक्‍तीत सुधारणा होते, प्रतिकारशक्ती वाढते व मनःस्थितीही चांगली राहते, असा नवा निष्कर्ष समोर आला आहे. 

कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा विद्यापीठातील संशोधक गटाचे प्रमुख ली. एस. बर्क यांनी डार्क चॉकलेटबाबतचे संशोधन मांडले. ""डार्क चॉकलेटच्या सेवनाचा मज्जासंस्थेवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास आम्ही अनेक वर्षे करीत आहोत. यातील साखरेचा परिणामाचा अभ्यासावर अधिक भर देण्यात आला. चॉकलेट जितके गोड तेवढे आपण आनंदी असतो, असे दिसून आले,'' अशी माहिती बर्क यांनी दिली. चॉकलेटसाठी वापरण्यात येणाऱ्या कोकोमध्ये एक विशिष्ट प्रकारचे रंगद्रव्य असते. ते अँटिऑक्‍सिडन्ट व दाहविरोधी काम करते, असे जगभरातील आरोग्यतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ पूर्वीपासून सांग आहेत. 

"चॉकलेटमधील कोकोचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास आम्ही प्रथमच केला. याचे परिणाम उत्साहवर्धक व सकारात्मक आले, असे बर्क यांनी सांगितले. या अहवालातील निष्कर्ष अमेरिकेतील सॅन दिऍगो येथे आयोजित केलेल्या "एक्‍सपिरिमेंटल बायोलॉजी 2018' या परिषदेत मांडण्यात आले आहेत. 

डार्क चॉकलेटचे परिणाम 
- पेशींमधील प्रतिकारशक्तीचे नियमन 
- मज्जासंस्थांचे नियंत्रणावर उपयुक्त 
- आकलनशक्तीवर प्रभावी 
- स्मरणशक्ती सुधारते 

लाभदायी डार्क चॉकलेट 
- कमी रक्तदाबावर मॅग्नेशियम उपयुक्त 
- कोलेस्ट्रॉल कमी होते 
- उत्साह वाढतो 
- वजन कमी करणे शक्‍य 

Web Title: Dark Chocolate for all Body and Mind will fresh says Report