माझ्या वडीलांनी राबडीदेवींची माफी मागावी अन्यथा...: आशा पासवान

माझ्या वडीलांनी राबडीदेवींची माफी मागावी अन्यथा...: आशा पासवान

नवी दिल्ली- लोक जनशक्तीचे पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना त्यांचीच मुलगी आशा पासवान यांनी आंदोलनाची धमकी दिली आहे. पासवान यांच्या ‘अंगठा छाप’वाल्या वक्तव्यावर आशा या नाराज असून त्यांनी रामविलास पासवान यांना राबडी देवींची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

आशा पासवान इथेच थांबल्या नाहीत. त्या म्हणाल्या, माझे वडील रामविलास पासवान यांनी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची माफी मागितली पाहिजे. नाहीतर मला माझ्या वडिलांविरोधातच आंदोलन करावे लागेल. मी पक्षाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करेन. त्यांच्या हाजीपूर मतदारसंघात त्यांच्याविरोधात प्रचार करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.

माझी आई अंगठा छाप होती म्हणूनच तिला सोडले होते, असेही आशा यांनी म्हटले. पासवान यांनी शुक्रवारी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना काही अंगठा छाप नेते मुख्यमंत्री होतात, असे म्हटले होते. आपल्या वडिलांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवींवर निशाणा साधताना संपूर्ण महिला समाजाचा अपमान केल्याचे आशा देवी यांनी म्हटले आहे. पासवान यांच्या वक्तव्यानंतर बिहारमध्ये आता ‘अंगठा छाप’वरून नवीन राजकारण सुरू झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com