माझ्या आईसाठी हवाय 'असा' नवरा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

आस्थाचे हे ट्विट 6 हजारांहून जास्त रिट्विट झाले आहे, तर 27 हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. आस्था तिच्या आईचे आयुष्य पुन्हा स्थिरस्थावर करू पाहात आहेत. यावरून सोशल मीडियावर काही लोकांनी तिला वेड्यातही काढले आहे.  

सध्या वधू-वर सूचक मंडळे ऑनलाईनही जोरात चालतात. आई-वडिल आपल्या मुला-मुलींसाठी परफेक्ट मॅच शोधण्यासाठी मॅट्रीमोनीवर अॅक्टिव्ह असतात. पण जय मुलगीच आईसाठी नवरा शोधत असेल तर? ऐकायला नवल वाटतंय ना? हो पण असं घडलंय. एक मुलगी तिच्या आईसाठी निर्व्यसनी, शाकाहारी 50 वर्षीय नवरा शोधतीय!

इलियाना करणार होती आत्महत्या, 'त्या' आजाराविषयी केला खुलासा

आस्था वर्मा या युवतीने ट्विटरवर आपला व आपल्या आईचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला 'मी माझ्या आईसाठी 50 वर्षींय हँडसम, शाकाहारी, निर्व्यसनी आणि स्थीर नवरा शोधत आहे. कोणी असल्यास कळवावे' असे कॅप्शन दिले आहे. या मायलेकींच्या कूल फोटोंमुळे या दोघी चर्चेत आल्या आहेत. तर आस्थाने आईबाबत उचललेल्या या पावलामुळे तिचे कौतुक होत आहे. 

आस्थाचे हे ट्विट 6 हजारांहून जास्त रिट्विट झाले आहे, तर 27 हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. आस्था तिच्या आईचे आयुष्य पुन्हा स्थिरस्थावर करू पाहात आहेत. यावरून सोशल मीडियावर काही लोकांनी तिला वेड्यातही काढले आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a daughter Astha Verma finding husband for her mother