नोकरी घोटाळ्यात भाजप खासदाराच्या मुलीला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

गुवाहाटी : आसाम लोकसेवा आयोगच्या (एपीएससी) परीक्षेत पैसे देऊन नोकरी मिळवल्या प्रकरणी भाजप खासदाराच्या मुलीसह 19 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आर.पी. शर्मा असे खासदारांचे नाव असून पल्लवी शर्मा ही त्यांची मुलगी आहे. 2016 मध्ये आसाम लोकसेवा आयोगाच्या आसाम नागरी सेवा (एसीएस), आसाम पोलीस सेवा (एपीएस) आणि सहाय्यक सेवेच्या परीक्षा झाल्या होत्या. पल्लवी शर्मा सध्या आसाम पोलीस दलात आधिकारी आहे.

आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई मुख्यमंत्री असताना कॅशच्या बदल्यात नोकरी घोटाळा झाला होता. आताचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल सरकारने भ्रष्ट्राचारविरोधातील आत्तापर्यंतचे सर्वांत मोठे अभियान आहे.

आसाम लोकसेवा आयोगाच्या या परीक्षांमधील घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या उत्तर पत्रिकांच्या फॉरेन्सिक चाचणीमध्ये विसंगती आढळून आली होती. त्यामुळे त्यांची हस्ताक्षर चाचणीत घेण्यात आली. परंतु, त्यांचे हस्ताक्षर जुळत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. 

दिब्रूगड पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलीस अधिक्षक गौतम बारो यांनी दिलेल्या माहितीनूसार, फॉरेन्सिक चाचणीत 19 अधिकाऱ्यांचे हस्ताक्षर त्यांच्या उत्तरपत्रिकेशी जुळले नाही. ते सर्व बनावट निघाले त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना गुवाहाटी येथून अटक करण्यात आली. 2016 मध्ये राकेश पाल हे आसाम लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होतो. पाल आणि आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांना कॅशच्या बदल्यात नोकरी देण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता अटक करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांची निवडही पाल यांनी आयोजित केलेल्या परीक्षा काळातच झाली आहे.

या प्रकरणी राकेश पाल यांच्यासह एपीएसी सदस्य समेदूर रहमान, वसंतकुमार डोळे आणि सहाय्यक परीक्षा नियंत्रक केबराता यांच्यासह 35 लोकांना अटक करण्यात आली होती. आता अटक केलेल्यामध्ये 13 एसीएस, 3 एपीएस आणि 3 सहाय्यक सेवांचे अधिकारी आहेत. यामध्ये तेजपूरचे भाजपा खासदार आर.पी. शर्मा यांच्याही मुलीचा समावेश आहे. त्यांची मुलगी पल्लवी शर्मा आसाम पोलीस दलात अधिकारी आहेत.

Web Title: daughter of BJP MP arrested in job scam