सुब्रह्यण्मयम स्वामींचे मोदी सरकारवर ट्विट-अस्त्र

वरुण गांधी यांच्यापाठोपाठ भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा ट्विट-अस्‍त्र सोडले आहे
 Subramanian Swamy
Subramanian Swamy sakal media

नवी दिल्ली : वरुण गांधी यांच्यापाठोपाठ भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा ट्विट-अस्‍त्र सोडले आहे. त्यांनी केंद्र सरकारचे स्वत: तयार केलेले अहवाल पुस्तक (‘रिपोर्ट कार्ड'') जारी केले आणि त्यात मोदी यांच्या ५ ठळक निर्णयांची ‘अपयशी‘ अशी संभावना करत ट्विट केले आहे. स्वामी यांनी भाजपतर्फे मिळालेल्या खासदारकीचा कालावधी संपत आल्यावर तृणमूल कॉंग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क वाढवला आहे.

 Subramanian Swamy
आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विट अखेरीस यास जबाबदार कोण? असा प्रश्न लिहून थेट पंतप्रधानांवरच नेम साधला आहे. स्वामी यांनी आता मोदी सरकारचे जे प्रगती पुस्तक जारी केले आहे त्यात त्यांनी प्रत्यक्षात सरकारच्या अधोगतीची पाच उदाहरणे दिली आहेत. ती अशी: अर्थव्यवस्था- नापास, सीमा सुरक्षा:नापास, परदेश धोरण:अफगाणिस्तानातील अपयश, राष्ट्रीय सुरक्षा:पेगासस एनएसओ, अंतर्गत सुरक्षा: अंधकारमय कश्मीर.

 Subramanian Swamy
बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

स्वामी हे गांधी घराण्याचे विशेषतः इंदिरा गांधी व आता सोनिया, राहुल गांधी-प्रियांका वाड्रा यांचे कडवे टीकाकार आहेत. त्यामुळेच भाजपने त्यांना राज्यसभेत आणले. भाजपतर्फे खासदारकी मिळाल्यावर स्वामी काही काळ शांत राहिले. नोटाबंदीपासून त्यांनी स्वपक्षाच्या निर्णयावर तोंडसुख घेण्यास सुरवात केली. त्यामुळे स्वामी यांना पक्षाने हळूहळू बाजूला सारले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com