चीनमधील चिप्सची पाकिटं असावी 'मेड इन मध्यप्रदेश' : राहुल गांधी

चीनमधील चिप्सची पाकिटं असावी 'मेड इन मध्यप्रदेश' : राहुल गांधी

नवी दिल्ली : ''चीनमधील तरुण पॅकेटमधील चिप्स खातील तेव्हा त्या पॅकेटवर 'मेड इन मध्यप्रदेश' असे लिहिलेले असेल. हा दिवस लवकरच येणार आहे. तो दूर नाही'', असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) सांगितले.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यानंतर आज राहुल गांधी यांची दामोह येथे झालेल्या जाहीर सभेत जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले,''चीनमधील तरुण पॅकेटमधील चिप्स खातील. तेव्हा त्या पॅकेटवर 'मेड इन मध्यप्रदेश' असे लिहिलेले असेल. हा दिवस लवकरच येणार आहे. तो दूर नाही''.

दरम्यान, काल (शुक्रवार) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी अमित शहा यांनी मध्यप्रदेशमध्ये प्रचारसभा घेतली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी ही सभा घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com