"दोन्ही लशी 110 % टक्के सुरक्षित; नपुसंकत्वाच्या अफवा खुळचट"

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

या लशी 110 % सुरक्षित आहेत. सौम्य ताप येणे, वेदना होणे आणि ऍलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लसीसाठी सामान्य असतात, असं DCGI चे व्ही. जी. सोमानी यांनी म्हटलं.

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी Drugs Controller General of India(DCGI) कडून मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर झायड्स कॅडिलाची लस 'झायकोव्ह-डी' च्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. 
याबाबत बोलताना DCGI चे बी जी सोमानी यांनी म्हटलं की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून थोडेदेखील धोकादायक असलेलं आम्ही काहीही मंजूर करणार नाही. या लशी 110 % सुरक्षित आहेत. सौम्य ताप येणे, वेदना होणे आणि ऍलर्जीसारखे काही दुष्परिणाम प्रत्येक लसीसाठी सामान्य असतात, असं त्यांनी म्हटलं. करोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येतं असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. याबाबत काय सांगाल, असे विचारले असता DCGI चे व्ही. जी. सोमानी यांनी स्पष्ट केलं की, असं म्हणणं साफ खुचळट आहे. 

समाजवादी पक्षाचे मिर्झापूरचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी लशीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, कोरोनाच्या लशीमध्ये काहीतरी असं असू शकतं, ज्यामुळे आपलं नुकसान होईल. उद्या लोकं म्हणतील की लस लोकसंख्या कमी करण्यासाठी दिली गेली आहे. तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता. लशीमुळे काहीही होऊ शकतं. असं खळबळजनक विधान समाजवादी पार्टीचे मिर्झापूरचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी केलं होतं. याच विधानाच्या  पार्श्वभूमीवर DCGI च्या व्ही. जी. सोमानी यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

हेही वाचा - ब्रेकिंग न्यूज : प्रतिक्षा संपली; DCGI कडून Covishield आणि Covaxin ला मंजुरी

करोनाच्या हाहाकाराला आळा घालण्यासाठी देशभरातील जनतेला लशीची प्रतिक्षा असताना समाजवादी पार्टीकडून लशीबाबत काल वादग्रस्त वक्तव्यं केली गेली होती. काल पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटलं होतं की आम्ही भाजपाच्या लशीवर विश्वास ठेवू शकत नाही. त्यांच्या पाठोपाठ समाजवादी पक्षाचे मिर्झापूरचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी लशीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 

याबाबतची पत्रकार परिषद आज दुपारी 11 वाजता पार पडली. DCGI चे बी जी सोमानी यांनी ही घोषणा केली. याआधी भारतातील तज्ज्ञांच्या समितीने या दोन्ही लशींच्या वापरासाठी मंजूरी दिली होती. नव्या वर्षात 1 जानेवारी रोजी सीरमच्या कोविशिल्ड लशीला मान्यता देण्यात आली होती तर 2 जानेवारी रोजी कोव्हॅक्सिनला तज्ज्ञांकडून ही मान्यता देण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DCGI says Vaccines are 110 % safe rumuors about people may get impotent is absolute rubbish

टॉपिकस