काश्मिरमध्ये अपहरण झालेल्या 'त्या' कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जुलै 2018

श्रीनगर : काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील काचदोरा गावातून दहशतवाद्यांनी गुरुवारी संध्याकाळी एका पोलिस कॉन्स्टेबलचे अपहरण केले होते.  या पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला असून,  जावेद अहमद दार असे त्यांचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी ते केमिस्टकडे जात असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले होते. 

एप्रिल महिन्यात सुरक्षा पथकांनी ज्या गावात पाच दहशतवाद्यांचा चकमकीमध्ये खात्मा केला होता. त्याच गावातून जावेद यांचे अपहरण करण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद यांच्यासाठी विशेष शोधमोहिम राबविण्यात आली होती.

हिजबुल या दहशतवादी संघटनेचा या अपहरणामागे हात आहे असे वृत्त एका हिंदी वाहिनीने दिले आहे. मागच्या महिन्यात भारतीय लष्करातील राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केली होती.

Web Title: dead body found of constable who kidnapped in kashmir