आधारकार्ड जोडणीची मुदत 31 मार्च पर्यंत वाढविणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

नवी दिल्ली - बँक खाते आणि विविध सरकारी योजनांसाठी आधारकार्ड जोडणीची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु, आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. मुदत वाढवण्यासंबंधी आज (शुक्रवार) केंद्र सरकारतर्फे अधिसूचना काढण्यात येणार आहे.

आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीवेळी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आधार जोडणीची मुदत वाढवण्यात येणार असून, आधार कार्ड सक्तीचे करण्याबाबतचा निर्णय मागे घेता येणार नसल्याचे यात म्हटले आहे. केंद्र सरकार यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले. 

Web Title: Deadline For Linking Aadhaar To Be Extended To March 31.