पोलिस कोठडीत अपंगाचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

महिलेसह चार पोलिस साध्या वेशात त्यांच्या घरात घुसले. महिला पोलिसांनी मला मारहाण केली तर पुरुषांनी पतीला मारहाण केली
Death
Deathesakal

चेन्नईतील महिलेने अपंग पतीला पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा (Death of a disabled person) आरोप केला आहे. यामुळे तीन पोलिसांना निलंबित करण्यात (Three policemen suspended) आले आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या प्रकरणाची सीबी-सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ए प्रभाकरन (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. १२ जानेवारी रोजी त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला होता. ही घटना तामिळनाडूतील सेलम आणि नमक्कल या दोन जिल्ह्यांची आहे.

प्राप्त माहितीनुसार, ८ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता प्रभाकरन ब्लाऊज शिवत होते. दरम्यान, महिलेसह चार पोलिस साध्या वेशात त्यांच्या घरात घुसले. महिला पोलिसांनी मला मारहाण केली तर पुरुषांनी पतीला मारहाण केली. त्यावेळी आम्हाला ते पोलिस आहेत हे माहीत नव्हते. नवरा मदतीसाठी ओरडत होता. यामुळे शेजारी जमा झाले. १२ वर्षांच्या मुलाने कॅमेऱ्यात घटनेचे चित्रीकरण सुरू केले. पोलिसांनी त्याचा फोन हिसकावून घेतला, असे पत्नी हंसलाने सांगितले.

Death
मी गाव गुंडाबद्दल बोलत होतो, त्याचं नाव मोदी आहे; पटोलेंचे स्पष्टीकरण

यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी प्रभाकरन यांना टॅक्सीत बसवले. हंसाला महिला अधिकाऱ्यासह मागच्या सीटवर बसवण्यात आले. दुचाकीवर दोन पोलिस जात (Death of a disabled person) होते. त्यांना सेंदमंगलम पोलिस क्वार्टरमध्ये नेण्यात आले. आम्हाला ना तुरुंगात नेले गेले ना न्यायालयात. तिथे पतीला सोने चोरीच्या आरोपात मारहाण करण्यात आली. नवरा माझ्या मदतीशिवाय चालू शकत नाही. ते हा गुन्हा कसा करू शकतात, असे पत्नीने सांगितले.

विरोधानंतर चौकशीचे आदेश

प्रभाकरन यांची प्रकृती ११ जानेवारीपासून बिघडू लागली आणि हंसला तुरुंगात असताना प्रभाकरन यांना नमक्कल सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. १२ जानेवारी रोजी त्यांना सालेम येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी १५ जानेवारीला तीन पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात (Three policemen suspended) आली. त्याच दिवशी प्रभाकरनचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सोमवारी विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर स्टॅलिन सरकारने कारवाई केली आणि या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com