निर्भया प्रकरणातील दोषींबाबत आज निर्णय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

राजधानी दिल्लीत 2012 साली चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींबाबत आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा कायम राहणार की त्यांना जन्मठेपेची शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत 2012 साली चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींबाबत आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा कायम राहणार की त्यांना जन्मठेपेची शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

16 डिसेंबर 2012 साली बलात्कार आणि हत्येचे भीषण प्रकरण समोर आले होते. दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली होती. एका अल्पवयीनासह सहा जणांनी मिळून चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर निर्भयाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला दोषींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दोषींमध्ये मुकेश, पवन, विजय शर्मा आणि आकाश कुमार सिंह या चौघांचा समावेश आहे. या प्रकरणातील राम सिंह नावाच्या दोषीचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक दोषी अल्पवयीन आहे. अल्पवयीन दोषी रिमांड होममधून यापूर्वीच बाहेर आला आहे. त्यामुळे चार दोषींबाबत आज दुपारी दोन वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश दीपक मिश्रा, आर. भानूमती आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Death penalty or life-term for four convicts? SC to decide today