दिल्लीत इमारतीला भीषण आग; 6 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग इतकी भीषण होती की, अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यादरम्यान काही लोकांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन स्वतःचा जीव बचावण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सोमवारी मध्यरात्री एका रहिवाशी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दक्षिण दिल्लीतील जाकीर नगरमध्ये एका इमारतीला आग लागली. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 11 जण गंभीररीत्या जखमी आहेत. आगीत जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. 

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग इतकी भीषण होती की, अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. त्यादरम्यान काही लोकांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन स्वतःचा जीव बचावण्याचा प्रयत्न केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death toll rises to 6 in the fire that broke out in a multi-storey building in Zakir Nagar New Delhi

टॅग्स